डॉक्टर शहाणे बंधूंचे लिखाण विद्यार्थ्यांना उपयुक्त - खा. उदयनराजे भोसले
नाशिक (प्रतिनिधी)
डॉक्टर राजेंद्र शहाणे आणि डॉक्टर कृष्णा शहाणे या शहाणे बंधूंनी लिहिलेल्या आंतरराष्ट्रीय विकासाचे अर्थशास्त्र तसेच त्यांनी लिहिलेली इतर क्रमिक पुस्तके ही अत्यंत दर्जेदार असून त्याने विद्यार्थ्यांचा निश्चितच फायदा होईल असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
डॉ. राजेंद्र शहाणे आणि डॉ. कृष्णा शहाणे या शहाणे बंधूंनी लिहिलेल्या
"आंतरराष्ट्रीय विकासाचे अर्थशास्त्र" या सर साहित्य केंद्र नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावरील तृतीय वर्ष कला या वर्गासाठी असणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन
हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते
डॉक्टर शहाणे बंधूंनी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमावर आधारित अर्थशास्त्राची पुस्तके लिहिल आहेत त्यांनी लिहिलेल्या 17 व्या पुस्तकाचे प्रकाशन जलमंदिर पॅलेस सातारा येथे नुकतेच संपन्न झाले. याप्रसंगी खासदार उदयनराजे भोसले यांनी डॉक्टर शहाणे बंधूंचे अभिनंदन करून त्यांनी यापुढे देखील दर्जेदार लिखाण करावे यासाठी शुभेच्छा दिल्या. शहाणे बंधूंच्या लिखाणाचा विद्यार्थी, अभ्यासू, जिज्ञासू यांना निश्चितच उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
What's Your Reaction?